ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, तेथील कोरोनाबाधितांची संख्या आता 11 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. मागील 24 तासात अमेरिकेत 30 हजार 829 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर 2201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिका मात्र, अद्यापही कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 10 लाख 95 हजार 023 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 63 हजार 856 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 52 हजार 324 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही अमेरिकेत 8 लाख 78 हजार 843 ॲक्टिव केसेस आहेत. त्यामधील 15 हजार 226 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया येथे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात 3 लाख 10 हजार 839 रुग्ण आढळले आहेत. तर 23 हजार 780 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर न्यू जर्सीमध्ये 1 लाख 18 हजार 652 कोरोना रुग्णांपैकी 7 हजार 228 लोक मरण पावले. या व्यतिरिक्त, मॅसाचुसेट्स, इलिनॉय येथेही कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे.