कॅनडात शिकलेल्या सुषमाची अनोखी कामगिरी : आजी-आजोबांकडून मिळविले हिंदू धर्माचे ज्ञान समलैंगिक विवाह करविणारी पहिली पुरोहित
भारतीय वंशाची सुषमा द्विवेदी वैवाहिक आणि धार्मिक विधी करविणारी अमेरिकेची पहिली महिला पुजारी ठरली आहे. अमेरिकेत आतापर्यंत अशाप्रकारचे विधी पुरुष पुजारीच करत आले आहेत. विवाह तसेच अन्य विधी करविण्याचा निर्णय घेताना सुषमाला स्वतःच्या आजीची मंजुरी घ्यावी लागती. आजीने स्वतः कुठलेच पौरोहित्य केले नसले तरी तिच्याकडे सुषमाला पुरोहित करण्याइतके ज्ञान होते.
आजीसोबत मिळून सर्व ग्रंथांचे अध्ययन केले. स्वतःचे ज्ञान पुढील पिढीला देण्याची व्यवस्था हिंदू धर्मात असल्याचे सुषमा सांगते. तिला हिंदू धर्माचे ज्ञान देखील स्वतःच्या स्थलांतरित आजी-आजोबांकडूनच प्राप्त झाले होते.
कॅनडात लहानाची मोठी झालेल्या सुषमासाठी आजी-आजोबा हेच हिंदू धर्माचे स्रोत राहिले आहेत. त्यांनी मॉन्ट्रियलमध्ये हिंदू मंदिर उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे मंदिर द्विवेदीच्या बालपणात महत्त्वाचे केंद्र राहिले. हिंदू धर्मात अनेक परंपरा आणि विचार मानणारे लोक आहेत.
जात-पात, लिंग, वंश किंवा लैंगिक कल बाजूला सारून आशीर्वाद विधी करविणारा पुरोहित होण्याची तयारी सुषमाने केली. कठोर मेहनत आणि दृढनिश्चय यातूनच सुषमा आता अमेरिकेतील पहिली महिला पुरोहित ठरली आहे. तसेच समलैंगिकांसह सर्वांचा विवाह करविण्याचे काम ती करत आहे.