ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत कोरोनामुळे मागील 24 तासात 1997 जणांचा मृत्यू झाला आहे. आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या जगात सर्वाधिक आहे. आतापर्यंत 40 हजार 565 जणांचा अमेरिकेत कोरोनाने बळी घेतला आहे.
कोरोनाबळींची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशही आता कोरोनापुढे हतबल झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात अमेरिका अद्याप अपयशी ठरली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 7 लाख 64 हजार 265 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 40 हजार 565 जणांचा मृत्यू झाला आहे. 71 हजार 012 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही अमेरिकेत 6 लाख 22 हजार 688 ॲक्टिव केसेस आहेत. त्यामधील 13 हजार 566 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेपाठोपाठ इटलीमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक आहे. इटलीत 23 हजार 660 जणांचा तर स्पेनमध्ये 20 हजार 453 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.