ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील जॅक्सनव्हिल येथे 24 ते 27 ऑगस्टदरम्यान होणारे रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आले आहे.
नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात होणाऱ्या या अधिवेशनात डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाणार होती. मात्र, फ्लोरिडात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने जॅक्सनव्हिल येथील गव्हर्नरांनी सार्वजनिक आरोग्याच्या कारणास्तव तेथे अधिवेशन घेण्यास नापसंती दर्शवली होती.
त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने हे अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता हे अधिवेशन होणार नसले तरी पक्षाचे प्रतिनिधी ठरल्याप्रमाणे जॅक्सनव्हिल येथील शार्लट भागात काही प्रमाणात एकत्र जमतील. कदाचित ऑनलाईन स्वरूपात हे अधिवेशन होईल, असे सांगण्यात आले आहे.