ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील साऊथ डकोटामध्ये स्मिथफील्ड या मीट (मांस) फॅक्टरीतील 725 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे चीनच्या वुहान मीट मार्केटनंतर आता अमेरिकेतील या मीट फॅक्टरीमुळे साऊथ डकोटा राज्यात जवळपास 55% लोकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्मिथफील्ड हा अमेरिकेतील पोर्क मीटचा (मांस) सर्वात मोठा ब्रँड आहे. या फॅक्टरीतून अमेरिकेत मीटचा पुरवठा केला जातो. या फॅक्टरीतील 3700 कर्मचाऱ्यांपैकी 725 कर्मचारी कोरोनाबधित असल्याने मीटमार्फत अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे अमेरिकेतील परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडण्याची चिन्हे आहेत.