ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेत मंगळवारी तब्बल २४ हजार 742 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 912 जणांचा मृत्यू झाला आहे.
जगभरातील सर्वात जास्त कोरोना संसर्गाचे प्रमाण अमेरिकेत आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 88 हजार 592 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 4055 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी तब्बल २४ हजार 742 नवे रुग्ण आढळल्याने अमेरिकेची चिंता आणखी वाढली आहे. चीनपेक्षाही अमेरिकेतील मृतांची संख्या अधिक झाली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचे 75 हजार रुग्ण आढळले असून 1714 जणांचा मृत्यू झाला आहे.