वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एच-1बी व्हिसासंबंधी नवा नियम प्रसारित केला आहे. नव्या नियमाच्या अंतर्गत अमेरिकन कर्मचाऱयांना रोजगाराची अधिक संधी मिळणार आहे आणि इमिग्रेशनवर मोठा अंकुश बसणार आहे. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने मंगळवारी एच-1बी व्हिसासंबंधी नवा नियम प्रसिद्ध केला आहे. अमेरिका दरवर्षी 85,000 एच-1बी व्हिसा प्रदान करते. या व्हिसाच्या मदतीने विदेशी कुशल कर्मचारी अमेरिकेत नोकरीसाठी जाऊ शकतो. नवा नियम लागू झाल्याने सर्वाधिक नुकसान भारतीय तंत्रज्ञांना होणार असल्याचे मानले जात आहे. 5 लाख अमेरिकन या महामारीत एच-1बी नॉन-इमिग्रंट्समुळे बेरोजगार झाल्याचे सांगण्यात येते.
70 टक्के व्हिसा भारतीय तंत्रज्ञांना
अमेरिकन प्रशासनाच्या आकडेवारीनुसार एच-1बी व्हिसाचे 70 टक्के प्रमाण भारतीय तंत्रज्ञांच्या वाटय़ाला जाते. भारतानंतर चीनचा क्रमांक लागतो. नवा नियम लागू झाल्यावर या व्हिसासाठी अर्ज करत असलेले एक-तृतीयांश आपोआप बाजूला होतील असे डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीकडून सांगण्यात आले आहे.