ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनामुळे कच्चा तेलाच्या किमतीत इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अमेरिकेत पहिल्यांदाच सर्वात मोठी घट पाहायल मिळाली. अमेरिकेत कच्च्या तेलाची किंमत बाटलीबंद पाण्यापेक्षा कमी म्हणजे प्रति लिटर 77 पैसे इतकी होती. पण आज ही किंमत शून्य पेक्षाही कमी म्हणजेच -37.56 प्रती बॅरल इतकी घासरल्याचे दिसत आहे.
वर्षाच्या सुरुवातीला, कच्च्या तेलाचे प्रति बॅरल 67 डॉलर होते, म्हणजेच प्रति लिटर 30.08 रुपये होती. त्यानंतर भारतात जेव्हा कोरोना प्रकरण सुरू झाले म्हणजेच 12 मार्च रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 38 डॉलर म्हणजेच 17.79 रुपये झाली. त्यानंतर 1 एप्रिल रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 23 डॉलर म्हणजेच 11 रुपये प्रति लिटर पर्यंत घसरली.
आता लॉक डाऊन मुळे सर्वच व्यवहार बंद आहेत. गाड्या, उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे तेलाची मागणी घटली आहे. सोमवारी जेव्हा बाजार सुरू झाला तेव्हा अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 10.34 वर आली. जी 1986 नंतर सर्वात निचांकी पातळी होती. यानंतर दुपार पर्यंत ते प्रति बॅरल 2 डॉलर च्या खाली आले आणि प्रति बॅरल 0.01डॉलर पर्यंत घसरले आहे.
जरी अमेरिकेत कच्चा तेलात घसरण झाली असली तरी भारतात मात्र आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल विनामूल्य किंवा स्वस्त मिळणार नाही.