ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहे. मागील 24 तासात अमेरिकेत तब्बल 1 लाख 83 हजार 527 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 1395 रुग्णांचा मृत्यू झाला. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 64 हजार 364 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 67 लाख 89 लाख 146 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 40 लाख 25 हजार 243 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 32 हजार 297रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 2 लाख 49 हजार 975 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 16 कोटी 51 लाख 41 हजार 738 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 10 लाख 78 हजार 194 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 19 हजार 946 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 10 लाख 17 हजार 123 जणांना बाधा झाली असून, 18 हजार 221 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 5 लाख 88 हजार 381 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 955 जणांचा मृत्यू झाला आहे.