ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत मागील 24 तासात 3176 हून अधिक जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या आता 50 हजारांपार पोहचली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशही आता कोरोनापुढे हतबल झाला आहे. वर्ल्डओमीटर या संकेतस्थळाने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिका मात्र, अद्यापही कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 8 लाख 86 हजार 442 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 50 हजार 236 जणांचा मृत्यू झाला आहे. 85 हजार 922 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही अमेरिकेत 7 लाख 50 हजार 284 ॲक्टिव केसेस आहेत. त्यामधील 14 हजार 997 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेपाठोपाठ इटलीमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक आहे. इटलीत 25 हजार 549 जणांचा तर स्पेनमध्ये 22 हजार 157 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.