ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 2.5 लाखांवर पोहचली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 12 लाख 26 हजार 038 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 51 हजार 256 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत शनिवारी 1 लाख 57 हजार 081 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 1260 जणांचा मृत्यू झाला. 1.12 कोटी कोरोना रूग्णांपैकी 68 लाख 91 हजार 015 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 40 लाख 83 हजार 767 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 20 हजार 415 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 10 लाख 86 हजार 987 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 20 हजार 064 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 10 लाख 24 हजार 870 जणांना बाधा झाली असून, 18 हजार 254 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 5 लाख 93 हजार 767 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 997 जणांचा मृत्यू झाला आहे.