ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या पावणेतीन लाखांवर पोहचली आहे. या देशात आतापर्यंत 1 कोटी 41 लाख 09 हजार 490 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 76 हजार 976 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत मंगळवारी 1 लाख 82 हजार 286 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 2614 जणांचा मृत्यू झाला. 1.41 कोटी कोरोना रूग्णांपैकी 83 लाख 33 हजार 255 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 54 लाख 98 हजार 372 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 25 हजार 722 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
टेक्सासमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 12 लाख 80 हजार 720 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 22 हजार 294 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 12 लाख 51 हजार 125 जणांना बाधा झाली असून, 19 हजार 323 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 6 लाख 94 हजार 060 रुग्ण आढळून आले. त्यामधील 34 हजार 655 जणांचा मृत्यू झाला आहे.