ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत कोरोनाबळींच्या संख्येने 1 लाखाचा टप्पा पूर्ण केला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 17 लाख 25 हजार 275 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 552 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. कोरोनाला रोखण्यात अद्यापही अमेरिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. 17.25 लाख कोरोना रूग्णांपैकी 4 लाख 79 हजार 969 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 11 लाख 44 हजार 734 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 17 हजार 158 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेतील 1,00,552 मृतांपैकी एक तृतीयांश मृत्यू हे न्यूयॉर्क शहरातील आहेत. अमेरिकेपाठोपाठ युकेमध्ये कोरोनाबळींची संख्या सर्वाधिक आहे. युकेमध्ये 2 लाख 65 हजार 277 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 37 हजार 048 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. ब्राझीलमध्ये 3 लाख 94 हजार 507 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 24 हजार 593 जणांचा मृत्यू झाला आहे.