ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने 70 लाखांचा टप्पा गाठला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 70 लाख 04 हजार 768 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2 लाख 04 हजार 118 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत रविवारी 33 हजार 345 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 294 जणांचा मृत्यू झाला आहे. 70 लाख कोरोना रूग्णांपैकी 42 लाख 50 लाख 140 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 25 लाख 50 हजार 510 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 14 हजार 020 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 9 कोटी 81 लाख 66 हजार 69 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 7 लाख 86 हजार 441 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 15 हजार 018 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 7 लाख 25 हजार 384 जणांना बाधा झाली असून, 15 हजार 206 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 4 लाख 83 हजार 704 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 177 जणांचा मृत्यू झाला आहे.