ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने 80 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 80 लाख 37 हजार 789 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 20 हजार 011 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत सोमवारी 45 हजार 791 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 316 जणांचा मृत्यू झाला आहे. 80.37 लाख कोरोना रूग्णांपैकी 51 लाख 84 लाख 615 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 26 लाख 33 हजार 163 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 14 हजार 914 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 11 कोटी 94 लाख 97 हजार 624 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 8 लाख 58 हजार 368 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 16 हजार 593 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 8 लाख 39 हजार 569 जणांना बाधा झाली असून, 17 हजार 098 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 5 लाख 10 हजार 610 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 391 जणांचा मृत्यू झाला आहे.