ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 90 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 89 लाख 62 हजार 783 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2 लाख 31 हजार 045 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत सोमवारी 69 हजार 841 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 529 जणांचा मृत्यू झाला आहे. 89.62 लाख कोरोना रूग्णांपैकी 58 लाख 33 लाख 824 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 28 लाख 97 हजार 914 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 16 हजार 611 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 13 कोटी 44 लाख 76 हजार 092 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
टेक्सास, कॅलिफोर्नियात सर्वाधिक रुग्ण
अमेरिकेतील टेक्सासमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 9 लाख 20 हजार 454 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 18 हजार 118 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 9 लाख 11 हजार 823 जणांना बाधा झाली असून, 17 हजार 400 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 5 लाख 33 हजार 064 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 580 जणांचा मृत्यू झाला आहे.