ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने 90 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 90 लाख 38 हजार 030 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 32 हजार 084 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत मंगळवारी 75 हजार 072 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 1039 जणांचा मृत्यू झाला आहे. 90.38 लाख कोरोना रूग्णांपैकी 58 लाख 77 लाख 964 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 29 लाख 27 हजार 982 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 16 हजार 761 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 13 कोटी 54 लाख 24 हजार 933 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 9 लाख 27 हजार 518 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 18 हजार 192 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 9 लाख 16 हजार 737 जणांना बाधा झाली असून, 17 हजार 478 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 5 लाख 35 हजार 120 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 600 जणांचा मृत्यू झाला आहे.