ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांनी 35 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 35 लाख 45 हजार 692 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 39 हजार 155 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत मंगळवारी 65 हजार 594 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 935 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमण अमेरिकेत झाले असून, दिवसेंदिवस तेथील रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 35.45 लाख कोरोना रूग्णांपैकी 16 लाख 910 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 18 लाख 05 हजार 627 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 16 हजार 337 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियात सर्वाधिक रुग्ण
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. 4 लाख 29 हजार 278 जणांना न्यूयॉर्कमध्ये कोरोनाची बाधा झाली आहे. तर 32 हजार 462 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कॅलिफोर्नियात 3 लाख 45 हजार 598 जणांना बाधा झाली असून, 7 हजार 235 रुग्ण दगावले आहेत.