ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांनी 55 लाखांचा टप्पा गाठला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 55 लाख 29 हजार 789 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 72 हजार 606 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत शनिवारी 53 हजार 523 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 1071 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमण अमेरिकेत झाले असून, दिवसेंदिवस तेथील रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 55.29 लाख कोरोना रूग्णांपैकी 29 लाख 188 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 24 लाख 56 हजार 995 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 17 हजार 186 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कॅलिफोर्नियात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. कॅलिफोर्नियात 6 लाख 01 हजार 075 जणांना बाधा झाली असून, 10 हजार 996 रुग्ण दगावले आहेत. याशिवाय न्यूयॉर्क, न्यू जर्सी, टेक्सास, इलिनॉयस आणि फ्लोरिडातही कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे.