ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 60 लाखांवर पोहचली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 60 लाख 46 हजार 634 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 84 हजार 796 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत गुरुवारी 46 हजार 286 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 1143 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमण अमेरिकेत झाले असून, दिवसेंदिवस तेथील रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 60.46 लाख कोरोना रूग्णांपैकी 33 लाख 47 लाख 940 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 25 लाख 13 हजार 898 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 16 हजार 231 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ब्राझीलमध्ये 37 लाख 64 हजार 493 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 29 लाख 47 हजार 250 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 6 लाख 98 हजार 517 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 18 हजार 726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.