मृतांमध्ये चार आशियाई महिलांचा समावेश
ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या जॉर्जियामधील अटलांटा शहरात तीन वेगवेगळ्या मसाज पार्लरवर झालेल्या गोळीबारात 8 जण ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये 4 आशियाई महिलांचा समावेश आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी रात्री अटलांटा शहरातील चेरोकी काउंटीमधील एका मसाज पार्लरवर अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरातील समोरासमोर असलेल्या दोन अन्य मसाज पार्लरवरही त्यांच्याकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला. मसाज पार्लर आणि गोळीबार करणाऱ्यांचा काही संबंध आहे, का याचा पोलीस शोध घेत आहेत.