ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील 24 तासात अमेरिकेत 2 लाख 35 हजार 372 रुग्ण आढळून आले. तर 2718 रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने अमेरिकेची चिंता वाढली आहे.
वर्ल्डोमीटरनुसार, अमेरिकेतील रुग्णसंख्या 1 कोटी 47 लाख 72 हजार 535 वर पोहचली आहे. त्यामधील 86 लाख 58 हजार 882 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, 58 लाख 28 हजार 103 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 26 हजार 153 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 2 लाख 85 हजार 550 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 20 कोटी 38 लाख 84 हजार 001 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
टेक्सासमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 13 लाख 31 हजार 516 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 22 हजार 977 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 13 लाख 15 हजार 352 जणांना बाधा झाली असून, 19 हजार 780 रुग्ण दगावले आहेत.