1.10 कोटी नागरिकांना मिळणार नागरिकत्व
ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने नुकताच ‘ड्रिम अँड प्रॉमिस’ कायदा 228-127 मतांच्या फरकाने मंजूर करून, पुढील प्रक्रियेसाठी तो सिनेटकडे पाठविण्यात आला आहे. या कायद्यामुळे अमेरिकेत अवैध पद्धतीने राहणाऱ्या 5 लाख भारतीयांसह अन्य देशातील जवळपास 1 कोटी नागरिकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार आहे.
अमेरिकेत कोणत्याही कागदपत्राशिवाय राहणाऱ्या परदेशी लोकांची संख्या 1.10 कोटी आहे. या लोकांना नागरिकत्व देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यासंदर्भातील कायदा संसदेत मांडला. हा कायदा सिनेटमध्ये मंजूर झाल्यास त्या नागरिकांना अमेरिकचे नागरिकत्व मिळणार आहे.