ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह असून, ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे अमेरिकेत देशाच्या सुरक्षेसाठी परमाणु हल्ला योजना लाँच करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्षांशी सार्वजनिक संपर्क होत नसेल तेव्हा अमेरिकेत ही योजना कार्यान्वित केली जाते.
परमाणु हल्ला योजनेनुसार अमेरिकन रक्षा मंत्रालयाने देशात हाय अलर्ट जाहीर केला असून, न्युक्लिअर डूम्स डे प्लॅनच्या विमानांनी सीमांवर गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या अनुपस्थितीत शत्रू राष्ट्रांवर अचानक हल्ला झाल्यास तो हल्ला थोपवून लावण्यासाठी ही योजना कार्यान्वित केली जाते.
अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात दोन ई-68 मर्क्युरी विमाने सतत गस्त घालत आहेत. या विमानांचा परमाणु बॅलेस्टिक मिसाईल असलेल्या पाणबुड्यांशी सतत संपर्क असतो. शत्रूच्या हल्ल्याची माहिती ही विमाने पाणबुड्यांना देतात. त्यानंतर या पाणबुड्या शत्रूला लक्ष्य करून त्यावर मिसाइल डागतात.