ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
‘फायझर-बायोएनटेक’च्या लसीच्या आपत्कालीन वापरास अमेरिकेच्या फूड एँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशनने परवानगी दिली आहे. फायझर कंपनीचे चेअरमन आणि सीईओ यांनी अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत करुन आनंद व्यक्त केला आहे.
अमेरिकन FDA च्या सल्लागार समितीमध्ये स्वतंत्र संशोधक तज्ज्ञ, संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि संशोधकांनी या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली.16 वर्षावरील व्यक्तींना आपत्कालीन परिस्थितीत ही लस देण्यात येईल.
फायझर-बायोएनटेकची लस कोरोनावर 95 टक्के प्रभावी आहे. ही लस व्यापक वापरासाठी योग्य असल्याचे ब्रिटनने म्हटले होते. ब्रिटननंतर कॅनडा आणि बहरिननेही फायझरच्या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे.