ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने 3 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या देशात आतापर्यंत 3 कोटी 81 हजार 657 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 5 लाख 47 हजार 234 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
रविवारी येथे 36 हजार 896 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 629 जणांचा मृत्यू झाला. एकूण 03 कोटी कोरोना रूग्णांपैकी 2 कोटी 21 लाख 69 हजार 237 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर अजूनही 63 लाख 65 हजार 186 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 09 हजार 404 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 38 कोटी 02 लाख 48 हजार 374 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
कॅलिफोर्नियामध्ये सर्वाधिक संक्रमण
कॅलिफोर्नियामध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 36 लाख 23 हजार 603 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 55 हजार 813 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 27 लाख 30 हजार 374 जणांना बाधा झाली असून, 46 हजार 697 रुग्ण दगावले आहेत.