ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोनाच्या डेल्टा प्रकाराचा वाढता धोका लक्षात घेता अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने ‘मॉडर्ना’ आणि ‘फायझर’ लसीच्या तिसऱ्या (बूस्टर) डोसच्या तातडीच्या वापराला मान्यता दिली आहे. इस्रायल आणि जर्मनीसारख्या इतर काही देशांनीही लसीचा तिसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेतील एफडीएच्या कार्यकारी आयुक्त जेनेट वुडकॉक म्हणाल्या, कोरोनाच्या डेल्टा प्रकाराचा वाढता धोका लक्षात घेता अमेरिकेच्या आरोग्य नियामकाने काही लोकांच्या गटाला लसीचा तिसरा डोस देण्यासाठी ‘इमर्जन्सी युथ ऑथोरायझेशन’ संशोधन केले. त्यानुसार कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले, अवयव प्रत्यारोपण करणारे किंवा कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराने ग्रासलेल्या लोकांना ‘मॉडर्ना’ आणि ‘फायझर’ लसीचा बूस्टर डोस घेता येणार आहे.
इस्रायल आणि जर्मनीतही दिला जातोय बूस्टर डोस
अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांमध्ये डेल्टाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन इस्रायल आणि जर्मनीमध्येही उच्च जोखमीच्या रुग्णांना लसीचा तिसरा डोस (बूस्टर) देण्यात आला आहे.