ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत मागील 24 तासात 73 हजार 388 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 963 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 36 लाख 95 हजार 302 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 1 लाख 41 हजार 188 जणांचा मृत्यू झाला आहे. 36.95 लाख कोरोना रूग्णांपैकी 16 लाख 69 हजार 749 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 18 लाख 74 हजार 435 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 16 हजार 452 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका जगात पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेत दररोज सरासरी 50 ते 60 हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे.