अमेरिकेत फेब्रुवारीपर्यंत कोरोनाबळींचा आकडा 5 लाखापार जाऊ शकतो असे नव्या अध्ययनात म्हटले गेले आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत कोरोना महामारी सर्वात मोठा मुद्दा ठरला आहे. दुसऱया लाटेवर नियंत्रण न मिळविण्यात आल्यास 5 लाख 11 हजार लोकांचा जीव जाऊ शकतो, असे युनिवर्सिटी ऑफ वॉशिंग्टनने म्हटले आहे.
स्लोवेनियाच्या विदेश मंत्र्यांना लागण
स्लोवेनियाचे विदेशमंत्री एंजी लोगर यांना कोरोनाची लागण झाली आहे. लोगर यांच्यात संसर्गाची कुठलीच लक्षणे दिसून आली नव्हती. ते पुढील 10 दिवसांपर्यंत आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचे विदेशमंत्रालयाने सांगितले आहे. स्लोवेनियामध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 20 लाख लोकसंख्या असलेल्या देशात प्रतिदिन 1500 हून अधिक रुग्ण सापडत आहेत.