ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेत तर या व्हायरस ने हाहाकार मजवला आहे. सध्या तिथे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे जवळपास 2000 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत मृतांचा आकडा 14 हजारच्या वर पोहचला आहे. तर चार लाख पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
मंगळवारी कोरोनामुळे 1939 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला. तर बुधवारी हा आकडा 1973 वर पोहोचला आहे. तर अमेरिकेतील मुख्य केंद्र असलेल्या न्यूयॉर्क मध्ये बुधवारी 779 लोकांचा मृत्यू झाला.
तर आत्तापर्यंत अमेरिकेत मृत्यू पावलेल्या नागरिकांमध्ये 11 भारतीयांचा समावेश आहे. तर अजून 16 भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्या भारतीय नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, ते सर्व पुरुष आहेत. यातील 10 जण न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी मधील आहेत. आणि मृत्यू झालेल्यांपैकी चार जण न्यूयॉर्क मधील असून ते तेथे टॅक्सी चालवण्याचे काम करत होते. अशी माहिती समोर आली आहे.