ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत वय वर्ष 16 आणि त्यावरील सर्वांना कोरोना लसीकरणासाठी मान्यता देण्यात आली आहे. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ॲन्ड प्रीव्हेन्शनने याबाबतची माहिती दिली आहे.
अमेरिकेमध्ये फायझर-बायोएनटेक, जॉन्सन आणि मॉडर्ना कंपनीच्या लसीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे. शनिवारपर्यंत या देशात 20 कोटी 58 लाख 71 हजार 913 लसीचे डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, अमेरिकेत 3 कोटी 24 लाख 75 हजार 043 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 कोटी 50 लाख 43 हजार 463 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 5 लाख 81 हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.