ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत मागील 24 तासात 18 हजार 905 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 373 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 20 लाख 07 हजार 449 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 1 लाख 12 हजार 469 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमण अमेरिकेत झाले आहे. दिवसेंदिवस तेथील रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 20.07 लाख कोरोना रूग्णांपैकी 7 लाख 61 हजार 708 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 11 लाख 33 हजार 272 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 16 हजार 923 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
न्यूयॉर्क, न्यू जर्सीमध्ये सर्वाधिक रुग्ण
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. 3 लाख 98 हजार 898 जणांना न्यूयॉर्कमध्ये कोरोनाची बाधा झाली आहे. तर 30 हजार 442 जणांचा मृत्यू झाला आहे. तर न्यू जर्सी शहरात 1 लाख 66 हजार 006 जणांना बाधा झाली असून, 12 हजार 216 रुग्ण दगावले आहेत.