ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत मागील 24 तासात 71 हजार 787 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 849 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने याबाबतची माहिती दिली आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 32 लाख 91 हजार 786 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 1 लाख 36 हजार 671 जणांचा मृत्यू झाला आहे. 32.91 लाख कोरोना रूग्णांपैकी 14 लाख 60 हजार 495 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 16 लाख 94 हजार 620 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 15 हजार 777 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका जगात पहिल्या क्रमांकावर आहे. दररोज सरासरी 50 हजारांच्या वर नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, परिस्थिती चिंताजनक बनल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मास्क वापरण्याचा निर्णय घेतला आहे. आज ट्रम्प वॉल्टर रीड मिलेट्री रुग्णालयातील सैनिकांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ट्रम्प मास्क घालणार आहेत.