ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत आतापर्यंत 66 लाख 76 हजार 601 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 39 लाख 50 हजार 354 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत शनिवारी 39 हजार 282 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 707 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या अमेरिकेत 25 लाख 28 हजार 119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 14 हजार 366 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 1 लाख 98 हजार 131 जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्राझीलमध्ये 35.53 लाख कोरोनामुक्त
ब्राझीलमध्ये 43 लाख 15 हजार 858 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 35 लाख 53 हजार 421 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अजूनही 6 लाख 31 हजार 163 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 1 लाख 31 हजार 274 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.