ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या डेलावेअर राज्यातील न्यू कॅसल काऊण्टीमधील हॉकसॅन येथे एका मंदिरात 45 टन वजनाची 25 फूट हनुमानाची मूर्ती स्थापन आली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हॉकसॅन येथील हिंदू टेम्पल ऑफ डेलावेअर असोसिएशनचे अध्यक्ष पातीबंदा शर्मा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या डेलावेअर राज्यात भारतीयांची संख्या जास्त आहे. तिथे असणाऱ्या हनुमानाच्या मोठ्या मंदिरात ही मूर्ती स्थापन आली आहे. ही मूर्ती तेलंगणामधील वारंगल येथे ग्रॅनाईट खडकापासून तयार करण्यात आली आहे. त्यानंतर ही मूर्ती अमेरिकेत आणण्यात आली. यासाठी 1 हजार डॉलरपेक्षा अधिक खर्च आला.या मूर्तीचे वजन तब्बल 45 टन असून, मूर्ती 25 फूट उंच आहे.