ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत आतापर्यंत 78 लाख 94 हजार 478 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 50 लाख 64 हजार 300 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत शुक्रवारी 60 हजार 558 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 910 जणांचा मृत्यू झाला आहे. 78.94 लाख कोरोना रूग्णांपैकी 26 लाख 11 हजार 530 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 14 हजार 777 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत 2 लाख 18 हजार 648 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 11 कोटी 64 लाख 98 हजार 135 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 8 लाख 49 हजार 552 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 4 लाख 37 हजार 354 रुग्ण बरे झाले आहेत. टेक्सासमध्ये 8 लाख 29 हजार 453 जणांना बाधा झाली असून, 7 लाख 16 हजार 009 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.