ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत आतापर्यंत 84 लाख 56 हजार 653 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 55 लाख 03 हजार 268 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत सोमवारी 57 हजार 327 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 442 जणांचा मृत्यू झाला आहे. 84.56 लाख कोरोना रूग्णांपैकी 27 लाख 28 हजार 163 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 15 हजार 501 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत 2 लाख 25 हजार 222 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 12 कोटी 70 लाख 57 हजार 107 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 8 लाख 80 हजार 871 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 4 लाख 57 हजार 313 रुग्ण बरे झाले आहेत. टेक्सासमध्ये 8 लाख 77 हजार 077 जणांना बाधा झाली असून, 7 लाख 45 हजार 944 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.