ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत 67 वर्षानंतर प्रथमच आज एका महिलेला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.
लिसा मोंटोगॉमेरी (वय 55) असे मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. इंडियाना प्रांतातील कारागृहात स्थानिक वेळेनुसार पहाटे 1 वाजून 31 मिनिटांनी तिला इंजेक्शन देऊन मृत्यूदंड देण्यात आला. अमेरिकेत 1953 साली एका महिलेला शेवटचा मृत्युदंड देण्यात आला होता.
लिसा यांनी एका गर्भवती महिलेची हत्या केली होती. तसेच तिच्या पोटातील गर्भ चाकूने बाहेर काढून तो आपला असल्याचे भासवले होते.