ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत लहान मुलांच्या लसीकरणाची प्रतीक्षा आता संपली आहे. 8 नोव्हेंबरपासून 5 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांना फायझरची लस देण्यात येणार आहे. राष्ट्राध्यक्ष जा बायडेन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
बायडेन म्हणाले, अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने 29 ऑक्टोबर रोजी लहान मुलांवरील फायझरच्या लसीला मान्यता दिली होती. त्यानंतर आता सरकारनेही त्याला हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे येत्या 8 नोव्हेंबरपासून अमेरिकेत 5 ते 11 वर्ष वयोगटाचे लसीकरण सुरू होणार आहे. एफडीएने लहान मुलांमध्ये फायझर लसीचे 10 मायक्रोग्रॅम डोस अधिकृत केले आहेत. 12 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी मूळ शॉट 30 मायक्रोग्रॅम आहे.
अमेरिकेनंतर संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी फायझरच्या कोरोना लसीलाही मान्यता दिली आहे.