ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने 2017 मध्ये रद्द केलेला डेफर्ड अॅक्शन फॉर चाईल्डहूड अरायव्हल्स (DACA) कायदा पुन्हा लागू करण्याचा आदेश न्यूयॉर्कच्या न्यायालयाने दिला आहे.
DACA हा स्थलांतर धोरणाचा एक भाग आहे. या कायद्यामुळे परदेशी लोक अमेरिकेत राहतात. यात काही मुलांना दोन वर्षांच्या पुनर्नवीकरणीय व्हिसाच्या आधारेही अमेरिकेत आणले जाते, त्यानंतर ते अमेरिकेत काम करण्यास पात्र होतात. या कायद्यांतर्गत पात्र मुलांना ‘ड्रीमर्स’असे म्हटले जाते.
न्यूयॉर्कमधील पूर्व जिल्ह्यचे न्यायाधीश निकोलस गरॉफिस यांनी दिलेल्या आदेशानुसार, या कायद्यान्वये संबंधिताना दोन वर्षे वाढवून देण्यात येणार आहेत. लोकांचे मुदतवाढीचे स्थलांतर अर्ज स्वीकारण्यास सोमवारपासून (दि.7) सुरुवात होणार आहे. त्यामुळे 2017 नंतर प्रथमच DACAनुसार पात्र व्यक्तींना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.