ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेने दहशतवादी संघटनांचा निधी रोखून त्यांच्या नाड्या आवळल्या आहेत. सन 2019 मध्ये अमेरिकेने जगभरातील जवळपास 70 दहशतवादी संघटनांचा 63 दशलक्ष डॉलर म्हणजेच 461 अब्ज रुपयांचा निधी रोखल्याचे समोर आले आहे.
लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा 3 लाख 42 हजार डॉलर, हक्कानी नेटवर्कचा 26 हजार 546 डॉलर, जैश-ए-मोहम्मदचा 1 हजार 725 डॉलर, हरकत-उल-मुज्जाहिद्दीनचा 45 हजार 798 डॉलर, हिज्बुल मुज्जाहिद्दीन 4 हजार 321 तर तेहरिके तालिबान पाकिस्तानचा 5 हजार 067 चा निधी अमेरिकेने रोखला आहे.
सन 2018 साली अमेरिकेने साडेतीन अब्ज रुपयांचा दहशतवादी संघटनांचा निधी रोखला होता. त्यामध्ये अल-कायदा संघटनेच्या 47 लाख रुपयांच्या निधीचा समावेश होता.