कोरोनाचा वाढता प्रभाव : आर्थिक वेग वाढविण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ लंडन
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पाठोपाठ आता बँक ऑफ इंग्लड यांनी बुधवारी रेपो दर 0.50 टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. रोपोदर कपातीनंतर रेपोदर 0.25 टक्क्यांवर राहणार असल्याचे सांगितले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेत आणि त्याला टक्कर देण्यासाठी हा पर्याय निवडला असल्याचेही सांगितले आहे. केंद्रीय बँकेने म्हटले आहे, की संकट काळात व्याजदर कपातीचा निर्णय कंपन्यांना मोठा दिलासा देणारा ठरणार असून ग्राहकांचा विश्वास वृद्धींगत होण्यास मोठी मदत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या आगोदर अमेरिकन फेडरलकडून 50 बेसिस पाँईटने कमी करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या अमेरिकेमध्ये रेपोदर 1.25 टक्के आहे. फेब्रुवारी महिन्यातही रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. कोरोनाचा प्रसार वाढत जात आहे. सध्या मृत्यू पावणाऱयाची संख्या 60 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ब्रिटिश अर्थव्यवस्थेने नवीन कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव चिंता निर्माण होत आहे. या शंकेने आर्थिक प्रगतीचा वेग मंदावत असल्याचे पहावयास मिळत आहे. बँकेनी दिलेल्या माहितीमधून सांगितले आहे. कोरोना पसरलेल्या क्षेत्रातील उत्पन्न आर्थिक समस्या लक्षात घेत कंपन्या आणि परिवार यांना मदत करण्यासाठी उपाय उपलब्ध केले जात आहेत. कंपन्यांनी व्यापार आणि लोकांना रोजगारात सक्षम बनविण्यास मदत हेण्यासाठीही व्याजदरात केली जात असल्याचे म्हटले आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे 373 प्रकरण समोर आली असल्याची माहिती दिली आहे. तर ब्रिटन सरकारने अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी चालू अर्थसंकल्पात अन्य उपाययोजना करण्याची घोषणा करणार असल्याचे संकेत आहेत.
आरबीआयचा रेपो दर कमी होणा?
भारतीय रिझर्व्ह बँक आगामी काळात व्याजदरात कपात करणार का नाही याबाबत अनेक मत व्यक्त होत आहेत. कारण कोरोनाचा वाढता प्रभाव हा आर्थिक विकासाला मोठा फटका देणारे ठरु शकते असे तज्ञांचे मत आहे.