ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लढाऊ विमानांच्या इंजिनची खरेदी करण्यासाठी भारत अमेरिकेसोबत संरक्षण साहित्य खरेदी करार करणार आहे. 70 कोटी डॉलर्सचा हा व्यवहार आहे.
भारत आणि अमेरिकेत होणाऱ्या या करारानुसार भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ या लढाऊ विमानामध्ये अमेरिकन इंजिन्स बसवण्यात येतील. भारत 100 GE 404 इंजिनची अमेरिकेकडे मागणी करणार आहे. ही इंजिन्स तेजसच्या LCA Mk1A या नव्या व्हर्जनसाठी वापरण्यात येणार आहेत. सध्या तेजसच्या LCA Mk1 या जुन्या व्हर्जनमध्येही अमेरिकेची इंजिन्स आहेत.