रिपब्लीकन ऐक्यासाठी रामदास आठवले यांनी अॅड. प्रकाश आंबेडकरांची भेट घ्यावी
सांगली : प्रतिनिधी
राज्यात रिपब्लीकन ऐक्य करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ऍड. प्रकाश आंबेडकरांची भेट घ्यावी, असे आवाहन पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी नथुराम गोडसेंवर आधारित असलेला अमोल कोल्हे यांचा चित्रपट राज्यात प्रदर्शित झाल्यास चित्रपटगृहांवरही हल्लाबोल करु असा इशारा पत्रकार बैठकीत दिला.
पीआरपी सांगली जिल्हातर्फे आयोजित पुरस्कार वितरणप्रसंगी ते सांगलीत आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पिआरपी चे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, डेमोक्रॅटीक पक्षाचे प्रा. सुकुमार कांबळे, जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे, संजय सोनवणे, गणेश उन्हउणे, गौतम कांबळे, शशिकांत सोनवणे, युसुफ शेख, यंगाप्पा शेट्टी, मलीक पठाण, सागर वाघमारे, परशराम कोळी, शहाबुद्दीन शेख, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.