प्रतिनिधी/ संकेश्वर
अम्मणगी (ता. हुक्केरी) येथील मल्लिकार्जुन देवाची यात्रा शासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली होती. मात्र, 11 रोजी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्याचा आदेश जारी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेताना यात्रा साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सवासाठी शासनाने नियम घालून दिले आहेत. त्यानुसारच यात्रा करावी लागणार आहे. यात्रोत्सवात सामाजिक अंतर व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजचे आहे. तसेच यात्रा कमिटीचे पदाधिकारी व पालखी समितीच्या सदस्यांना त्याप्रमाणे यात्रा प्रमुखांना धार्मिक विधी पार पाडण्याची परवानगी देण्यात आली आहे. येत्या 13 ते 17 जानेवारी 2021 या कालावधीत धार्मिक कार्यक्रम साध्या पद्धतीने होणार आहेत. देवालय परिसरात खेळणी, मिठाई यासह छोटी-मोठी दुकाने तसेच पाळणे थाटता येणार नाहीत. त्याचबरोबर जनावरांचे प्रदर्शन, कुस्ती मैदान होणार नाही. याची नोंद सर्व भाविकांनी घ्यावी, असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.