ऑनलाईन टीम / लखनऊ :
अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी 15 जानेवारी ते 27 फेबुवारीदरम्यान समर्पण निधी मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत आलेले 22 कोटी रुपये मुल्य असलेले तब्बल 15 हजार चेक बाऊन्स झाले आहेत. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी ही माहिती दिली.
चंपत राय म्हणाले, काही तांत्रिक कारणांमुळे हे चेक बाऊन्स झाले आहेत. ज्यांचे चेक बाऊन्स झाले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. काही जणांशी संपर्क झाला असून, त्यांनी नव्याने दुसरे चेक दिले आहेत. ते क्लिअरही झाले आहेत. अन्य लोकांशी आता संपर्क साधण्यात येत आहे.
दरम्यान, राम मंदिर उभारणीसाठी समर्पण निधी मोहिमेअंतर्गत 4 मार्चपर्यंत 2500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे.