ऑनलाईन टीम / अयोध्या :
मंत्रोच्चाराच्या गजरात अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडले. राम मंदिरासाठी एकूण 9 शिळांचे मोदींनी पूजन केले. पायभरणीसाठी चांदीचे फावडे वापरण्यात आले. तसेच त्याठिकाणी चांदीची वीट ठेवण्यात आली.
दुपारी 12 वाजून 44 मिनिटे 8 सेकंदापासून 12 वाजून 40 मिनिटे 44 सेकंद या 32 सेकंदाच्या कालावधीत मोदींनी राम मंदिराचे भूमिपूजन केले. हा 32 सेकंदांचा मुहूर्त भूमिपूजनासाठी शुभ मानण्यात आला होता. भूमीपूजनापूर्वी मोदींनी हनुमान गढी येथे पूजा केली. त्यानंतर एका पारिजातकाचे त्यांनी वृक्षारोपण केले.
सोशल डिस्टन्स पाळत भूमिपूजनाची मुख्य पूजा पार पडली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत.