ऑनलाईन टीम / लखनऊ :
अयोध्येतील हनुमानगढीचे महंत कन्हैया दास यांची शनिवारी रात्री विटांनी ठेचून हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह चरणपादुका मंदिराच्या गौशाळेत सापडला आहे. ते बसंतीया पट्टीशी संबंधित गुलचमन बागचे महंत होते.
अयोध्येतील कोतवाली रायगंज परिसरातील चरणपादुका मंदिराच्या गोशाळेत महंत कन्हैया दास झोपले होते. मध्यरात्री अज्ञातांनी विटांनी त्यांचे डोके ठेचून हत्या केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून फिंगरप्रिंट एक्सपर्टही घटनास्थळी उपस्थित आहेत.
दरम्यान, मृत महंत आणि गोलू उर्फ शशिकांत दास यांच्यात जमीन आणि घराच्या जागेवरून वाद सुरू होते. न्यायालयातही याचा खटला सुरू होता. कन्हैया दास यांचे गुरुभाऊ रामानुजदास चेला रामवरण दास यांच्या आरोपांवरून शशिकांत दास यांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.