ऑनलाईन टीम / अयोध्या :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी भूमीपूजन झाल्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
चंपत राय यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भगवान श्रीराम यांच्या पवित्र जन्मस्थळावर त्यांचे भव्य मंदिर बांधण्याचे काम सुरू झाले आहे. कोट्यवधी रामभक्तांना मंदिर बांधण्यात हातभार लावायचा आहे. त्यासाठी त्यांनी नागरिकांना देणगी देण्याचे आवाहन केले आहे. आर्थिक मदतीसाठी राममंदिर ट्रस्टने खाते क्रमांक आणि अन्य माहितीही शेअर केली आहे.