वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अरबिंदो फार्मा या औषध कंपनीचा चालू वित्त वर्षातील पहिल्या तिमाहीतील निव्वळ नफा हा 22.81 टक्क्मयांनी वधारुन 780.68 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. सदर कामगिरीची नोंद होण्यामागे अमेरिकी बाजारामधील कंपन्यांची विक्री वाढल्यानेच हे शक्मय झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
या अगोदरच्या वित्त वर्षात 2019-20 च्या एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीला 635.68 कोटींचा लाभ झाला असल्याची माहिती शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे. यासोबतच कंपनीचे उत्पन्न हे 5,924.78 कोटीवर पोहोचले असून हे मागील वर्षात समान कालावधीत 5.444.60 कोटी राहिले आहे.
कठीण कालावधीतही कंपनीने केलेली समाधानकारक कामगिरीच्या सोबतच नवीन वित्त वर्षाचा प्रारंभ झाला असून यात अशीच प्रगती होत राहण्याची अपेक्षा कंपनीचे संचालक एन. गोविंदराजन यांनी म्हटले आहे. कर्मचाऱयांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षा याच्यासाठी आम्ही एक करार केला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.